Tips – जेवणानंतर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, आरोग्यावर होतो वाईट परिणाम

1 week ago 9
food

कार्पोरेट लाईफस्टाईल आणि धकाधकीचे जीवन यामुळे आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कमी झोप, अवेळी खाणे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवई याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. जेवण करताना आपण जसे लक्ष देतो, तसेच जेवणानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. काहींना जेवणानंतर फळं खाण्याची, सिगारेट पिण्याची सवय असते, मात्र असे करणे घातक आहे. जाणून घेऊया…

जेवण झाल्यानंतर तात्काळ खूप थंड पाणी पिऊ नये. याने आरोग्याला धोका पोहोचू शकतो. तसेचर यामुळे आर्टरीज ब्लॉक देखील होऊ शकतात. अनेकांना जेवण झाल्यानंतर लगेचच सिगारेट ओढण्याची तल्लफ येते. पण ही अतिशय वाईट सवय आहे. याचा थेट परिणाम तुमच्या फुफ्फुसांवर होत असतो. जेवणानंतर सिगरेट अथवा तंबाखू खाण्याने गॅसेस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने अन्नपचन क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जेवणाआधी, जेवताना किंवा नंतर अर्ध्यातासाचे अंतर ठेवून फळे खावीत. जेवण झाल्यावर लगेचच चहा किंवा कॉफीचे सेवन केल्याने शरीरात घातक रसायनांची निर्मिती व्हायला लागते. त्यामुळे लगेचच चहा किंवा कॉफी घेणे टाळा. रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला जर पिझ्झा, बर्गर, फ्राईज यासारखे फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर ती आत्ताच बदला. कारण यामुळे अपचन किंवा अॅसिडिटीमुळे निद्रानाश होऊ शकतो. जेवणानंतर लगेचच स्नान केल्याने हात आणि पाय यामधील रक्त पुरवठा जलद गतीने सुरू होतो. यामुळे पोटात हव्या असलेल्या रक्ताचा पुरवठा कमी होऊन पचन क्रियेवर ताण पडून ती कमजोर होण्याचा धोका असतो.
Read Entire Article