Tiktok व्हिडिओसाठी रोखली बंदुक; गोळी सुटली आणि तरुणीचा झाला मृत्यू

4 months ago 817

Tiktok व्हिडिओसाठी रोखली बंदुक; गोळी सुटली आणि तरुणीचा झाला मृत्यू

भारतात जरी टिकटॉक Appला बंदी असली तरी जगात अनेक ठिकाणी टिकटॉकचे तितकेच क्रेंज अजूनही आहे. कधी टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून हत्या केली जाते तर कधी टिकटॉकवरील फॉलोअर्स वाढण्यासाठी अनेक कृत्य केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच टिकटॉकचा व्हिडिओ करताना भयंकर घटना घडल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. अशीच एक भयंकर घटना उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये घडली आहे. मेक्सिकोमधील चिहुहुआ राज्यात टिकटॉकचा व्हिडिओ करत असताना गोळी लागल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका तरुणीला १० साथीदार किडनॅप करत आहेत, असा व्हिडिओ तयार केला जात होता. पण त्यादरम्यान गोळी सुटली आणि तरुणीचा मृत्यू झाला.

मेक्सिकोमधल्या या तरुणीचे नाव अरेलिन मार्टिन्ज असे आहे. ही तरुणी आपल्या मित्रांसोबत एका छोट्या फार्म हाऊसमध्ये टिकटॉक व्हिडिओ शूट करत होती. त्यामध्ये तरुणीचे हात बांधून तिच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला असे दाखवण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. पण हा व्हिडिओ करताना गोंधळ झाला आणि त्या व्यक्तीच्या हातून ट्रिगर दाबला गेला आणि त्या तरुणीला गोळी लागून तिचा मृत्यू झाला असा अंदाज आहे. यावेळेस तिच्या सोबत असलेले सर्व मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने या १० जणांमधील घटनेची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती देणारा व्यक्तीसुद्धा घटनास्थळावरून पळून गेला होता. यामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्ती शिक्षा दिली जाणार आहे. तसेच या व्यक्तींकडे हत्यार कुठून आले याचा देखील तपास केला जाणार आहे.


हेही वाचा – जावयाचा सासूवर बलात्कार; तक्रार दाखल होताच आत्महत्येचा प्रयत्न


 

Read Entire Article