N-95 मास्क कोरोना विषाणू रोखण्यासाठी कामाचे नाहीत! वापर तत्काळ थांबवा, केंद्र सरकारच्या सूचना

7 months ago 676
n-95-mask

हिंदुस्थानात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच केंद्र सरकारतर्फे सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सूचनावली प्रसिद्ध केली आहे. यामध्ये N-95 हे मास्क कोरोनापासून बचाव करण्यासाठी अजिबात कामाचे नाही असं म्हटले आहे. आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक डॉ.राजीव गर्ग यांनी याबाबतचे पत्र लिहिले आहे. ज्यात म्हटलंय की N-95 मास्क हे कामाचे नसून व्हॉल्व्ह असलेले मास्क तर त्याहूनही कामाचे नाहीत. हे मास्क विषाणू तोंडातून बाहेर पडण्यास अटकाव करत नसल्याचं गर्ग यांनी पत्रात म्हटलं आहे. या मास्कच्या वापर तातडीने थांबवण्याची गरज असल्याचेही गर्ग यांनी म्हटले आहे.

तीन स्तराचे (Triple Layer mask) मास्क उपयुक्त
सरकारच्या सूचनावलीनुसार कोरोनापासून बचाव करायचा असेल तर 3 स्तराचा मास्कच सगळ्यात उत्तम आहे. WHO ने देखील हाच मास्क उत्तम असल्याचं सांगितलं आहे. यामुळेच आरोग्यक्षेत्रातील मंडळी याच मास्कला प्राधान्य देताना दिसत आहेत. केंद्र सरकारने मास्कबाबत एक विस्तृत सूचनावली प्रसिद्ध केली आहे. यामध्ये त्यांनी घरी बनवलेल्या मास्कनाच प्राधान्य देण्यास सांगितले आहे. घरी बनवलेले मास्क रोज धुवून, सुकवून वापरावेत असं सूचनावलीमध्ये म्हटलं आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा मुख्य टर्मिनसवर प्रवाशांना फेस कव्हर, N-95 मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर या सध्याच्या घडीला महत्वाच्या असणार्‍या वस्तू ‘नॉन फेअर रेव्हेन्यू’ अंतर्गत माफक दरात पुरविणारे ऑटोमेटीक वेन्डींग मशिन डिस्पेन्सर बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने 12 मे पासून राजधानीच्या मार्गावर 30 वातानुकूलित ट्रेन सुरू केल्या, त्यानंतर 1 जूनपासून 200 वेळापत्रकावर आधारित धावणार्‍या मेल-एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या टर्मिनसवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून प्रवाशांना राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व संकेत पाळून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांना चांगले दर्जेदार फेस कव्हर, मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरच्या बॉटल्स माफक दरात मिळणे सोयीचे व्हावे यासाठी हे अभिनव पद्धतीचे वेंडिंग मशिन बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली होती. त्यामुळे प्रवासात आपला फेस मास्क जुना झाला असेल किंवा सॅनिटाझयर संपले असेल तर घाईघाईत नकली वस्तू घेण्यापेक्षा चांगल्या दर्जेदार ‘कोविड-19’ बचावाच्या वस्तू विकत घेणे प्रवाशांना सोपे झाले होते. मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या सूचनावलीनंतर या N-95 मास्कच्या विक्रीबाबत रेल्वे प्रशासनालाही निर्णय घ्यावा लागेल

Read Entire Article