Gold Rate Today: सलग दुसर्‍या दिवशी सोने महागले, 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय?

1 week ago 1
gold silver latest rate

नवी दिल्लीः जागतिक बाजारपेठेतील जोरदार हालचाली पाहता सोन्या-चांदीच्या किमती सलग दुसर्‍या दिवशीही वाढल्या आहेत. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 337 रुपयांनी वाढून 46,372 रुपये झाला. सोमवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,035 रुपयांवर बंद झाले होते. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 1,149 रुपयांनी वाढून 69,667 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यापार सत्रात तो प्रति किलो 68,518 रुपयांवर बंद झाला होता. (Gold Silver Latest Rate On 23 February 2021 Gold Jumps Rs 337 Per 10 Gram Know Rates)

आजची सोन्याची आणि चांदीची किंमत (23 फेब्रुवारी 2021 रोजी सोने व चांदीची किंमत)

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 337 रुपयांवर व्यापार करत होते. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात तेजी आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,808 डॉलर आणि चांदी 28.08 डॉलर प्रति औंस होते.

गोल्ड डिलिव्हरीचा दर

सराफा बाजाराप्रमाणे सोने आणि चांदीच्या वायदेच्या व्यापारात घसरण झालीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) एप्रिल गोल्ड रेट फ्युचर्समध्ये 0.12 टक्क्यांनी घट झाली. मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात सोन्यावर दबाव होता. सकाळी एमसीएक्सवरील एप्रिल सोन्याच्या वायद्याच्या किमती 0.06 टक्क्यांनी वाढल्या.

चांदी डिलिव्हरीचा दर

यावेळी एमसीएक्सवर चांदीच्या डिलिव्हरीच्या दरात घट नोंदवली गेलीय. मार्च डिलिव्हरीसाठी चांदीच्या दरात 343 रुपयांची घसरण नोंदवून चांदी प्रतिकिलो 70,089.00 रुपयांवर व्यापार करीत होती.

22 ते 28 फेब्रुवारी सोन्याचा भाव काय राहील?

देशात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असल्यानं सोन्याच्या भावातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. कोरोना लसीकरण सुरू असले तरी त्याचा सोन्याच्या दरावर फारसा प्रभाव पडणार नसल्याचं जाणकार सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीने व्यापार करतेय. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार 8.86 डॉलरने घसरून 1,767.93 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. चांदीची किंमत 0.33 डॉलरने घसरून 26.66 डॉलरवर पोहोचली आहे. पण येत्या आठवड्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सोने खरेदीला भारतामध्ये मोठी पसंती आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास पोहोचले तरी नागरिक ते नक्कीच खरेदी करतील. लोक सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोन्याच्या किमती जागतिक परिस्थितीवर अवलंबून असतात

भारतात सोन्याला मोठी मागणी आहे, परंतु त्याची किंमत जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असते. एकीकडे संपूर्ण जग वर्ष 2020 मध्ये कोरोना साथीशी दोन हात करत होते. तर दुसरीकडे सोनं सतत विक्रम नोंदवत होते. वर्ष 2020 मध्ये सोन्याच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर जागतिक पातळीवर सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली. खरं तर कोरोना महामारीमुळे, गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटपेक्षा सराफामध्ये जास्त गुंतवणूक केली. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता भविष्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या

Special Report: Gold Rate Today: सोने फेब्रुवारीच्या 20 दिवसांत 3292 रुपयांनी स्वस्त; येत्या आठवड्याभरात स्वस्त होणार की महागणार?

Gold Silver Latest Rate On 23 February 2021 Gold Jumps Rs 337 Per 10 Gram Know Rates

The post Gold Rate Today: सलग दुसर्‍या दिवशी सोने महागले, 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय? appeared first on TV9 Marathi.

Read Entire Article