सोलापूर शहरात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

1 week ago 5

मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती, बरे झाल्याने ७० रुग्णांना सोडले घरी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहरात मंगळवारी नव्याने ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर उपचार घेऊन बरे झाल्याने ७० जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

सोलापूर शहरात  ४९६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ४८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ११ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ८ पुरुष तर ३ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार २२१ झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : १७०६९७

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : १२२२१

प्राप्त तपासणी अहवाल : १७,०६९८

प्रलंबित तपासणी अहवाल ००

निगेटिव्ह अहवाल : १५८५७७

आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : ६५३

रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : ३८०

रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : १११८८
Read Entire Article