सोलापूर ग्रामीणमध्ये आज २८ नवे कोरोना रुग्ण

1 week ago 9

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज मंगळवारी  नवे कोरोनाबाधित २८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. २८ पैकी १६ पुरुष, १२ स्त्रियांचा समावेश आहे. आज १ तर  आतापर्यंत ११७७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ४० हजार २६७ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ३६९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी  दिली. 

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज १२३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  १२११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर २८ पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत ११७७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४० हजार २६७ जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

होम क्वांरटाईन – ५६५

एकूण तपासणी व्यक्ती-  ५०२६०५

प्राप्त अहवाल- ५०२४९८

प्रलंबित अहवाल- १०७

एकूण निगेटिव्ह – ४६२२३२

कोरोनाबाधितांची संख्या- ४०२६७

रुग्णालयात दाखल – ३६९

आतापर्यंत बरे – ३८७२१

मृत – ११७७
Read Entire Article