सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबी देओलने शेअर केला फोटो!

1 month ago 1166
boby deol

मुंबई : नुकताच ‘आश्रम’ या सुपरहिट वेब सीरिजसाठी बॉबी देओलला (Bobby Deol) 5 व्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी बॉबीने आपली आई प्रकाश कौरसोबत एक अतिशय चांगला फोटो शेअर करत चाहत्यांना यांची माहिती दिली आहे. (Photo shared by Bobby Deol after receiving the Best Actor award)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

एकेकाळी स्टार असलेल्या बॉबी देओलनेही आपल्या कारकिर्दीतील एक अतिशय वाईट टप्पा पाहिला आहे. पण 2018 मध्ये ‘रेस 3’ च्या यशानंतर बॉबीने जोरदार पुनरागमन केले आहे. आश्रम वेब सीरिजमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेसाठी बॉबीला हा पुरस्कार मिळाला आहे. बॉबीने आईसोबत एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, आईसोबत हा जिंकलेला वेळ, बॉबी सध्या त्याच्या आगामी ‘लव्ह हॉस्टेल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

ज्यात विक्रांत मैसी आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बॉबीला दाक्षिणात्य एका मोठ्या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेची ऑफर देण्यात आल्याची बातमी आहे. एका मुलाखतीमध्ये बॉबी देओलने सांगितले होते की, माझ्या आश्रम वेब सीरीजमधील काही भाग माझे वडील धर्मेंद्र यांनी बघितले आणि त्यांना ते खूप आवडले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

आश्रम वेब सीरीजमध्ये मी खूप छान काम करत असल्याचे देखील ते म्हणाले होते. असेच काम करत राहा, म्हणत त्यांनी मला आशीर्वाद दिले. बॉबी देओलने कमबॅक केल्यामुळे धर्मेंद्र खूपच खुश असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या : 

करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव काय? सोशल मीडियावर खमंग चर्चा!

Video : बोल्ड आणि टोल्ड नेहा पेंडसे, खास व्हिडीओ शेअर करत नवऱ्याला गिफ्ट!

Video : ‘हाता तोंडाम्होरं घास परी गिळना, गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना’; शालूच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी

(Photo shared by Bobby Deol after receiving the Best Actor award)

The post सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबी देओलने शेअर केला फोटो! appeared first on TV9 Marathi.

Read Entire Article