संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं, पोहरादेवी गर्दीवर शिवसेनेचं पहिलं भाष्य

1 week ago 4
Sanjay Rathod supporter mob 2

मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर (Pohradevi crowd) केलेल्या गर्दीवर शिवसेनेने (Shiv Sena) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं, प्रत्येकाने जबाबदारी पाळली पाहिजे होती”, असं शिवसेना प्रवक्ता मनिषा कांयदे (Manisha Kayande) यांनी म्हटलंय. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय, सामाजिक, धार्मीक कार्यक्रम स्थगित करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan suicide) नॉट रिचेबल असलेले संजय राठोड 16 दिवसांनी समोर आले. त्यांनी आज पोहरादेवी गडावर हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांनी एकच गर्दी केली होती.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा मुसंडी मारली आहे. काल दिवसभरात 7 हजार रुग्ण सापडले. अचानक रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र संजय राठोड यांच्या समर्थकांनी गर्दी करुन, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दिल्याचा आरोप, विरोधक करत आहेत.

मनिषा कायंदे काय म्हणाल्या? 

याबाबत शिवसेनेकडून आमदार मनिषा कायंदे यांनी बाजू मांडली. मनिषा कायंदे म्हणाल्या, “संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं. प्रत्येकाने जबाबदारी पाळली पाहिजे होती. हा वेगळा विषय असल्यामुळे ते कुटुंबासोबत गेले होते. संजय राठोडांना वादाच्या भोवऱ्यात ओढलं जात आहे. पूजा चव्हाण आत्मतहत्याप्रकरणात चौकशी सुरु आहे, त्यात तथ्य बाहेर येईल. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही असाच आकतांडव केला गेला”

हा विषय अत्यंत संवेदनशील होता

“मला असं वाटत नाही की त्यांनी कोणाला निमंत्रण दिलं असेल. हा विषय अत्यंत संवेदनशील होता. त्यांच्या सामाजिक, राजकीय जीवनावर परिणाम करणारा होता. ते प्रथमच मीडियाशी बोलले. एक कौटुंबीक कार्यक्रम होता. त्यामध्ये त्यांच्या समाजाचे लोक गेले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन ही प्रत्येकाची जबाबदारी आहेच, खासकरुन मंत्र्यांची आहे. मी म्हणेन मीडियाही तुफान तिकडे गेला होता. कौटुंबीक दर्शन जे होतं, त्याला वेगळं स्वरुप होतं. परंतु ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मीच जबाबदार, त्यामुळे ही प्रत्येकाने जबाबदारी उचलायला हवी. पण हा वेगळा विषय त्यांच्या जीवनातला होता. त्यामुळे संजय राठोड त्यांच्या कुटुंबासोबत तिथे दर्शनाला गेले”, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

संजय राठोडांचं शक्तीप्रदर्शन

दरम्यान, राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर जाऊन दर्शन घेतलं. जवळपास 15 दिवसांनी समोर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी. या प्रकरणात घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचं आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं संजय राठोड म्हणाले. यावेळी संजय राठोड यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली होती.

संजय राठोडांच्या समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

संजय राठोडांच्या समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडावला. राठोडांचे हजारो समर्थक मंदिर परिसरात दाखल झाले होते. पोलिसांना न जुमानता समर्थकांनी मोठी गर्दी केली. जिल्हा प्रशासनानं फक्त 50 जणांना हजर राहण्याची परवानगी दिली होती. मात्र हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक पोहरादेवी गडावर उपस्थित होते.

संबंधित बातम्या 

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | संजय राठोड पोहरादेवी गडावर, समर्थकांची प्रचंड गर्दी

पूजा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती, तिचे आईवडील गप्प का?; चुलत आजीचे सवाल

‘पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी आपल्या कृत्याची कबुली द्यावी’

The post संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं, पोहरादेवी गर्दीवर शिवसेनेचं पहिलं भाष्य appeared first on TV9 Marathi.

Read Entire Article