लातूर – मोबाईलवरुन झालेल्या बाचाबाची नंतर चाकूने भोसकून खून

1 week ago 1
police-thane-gandhi-chowk-latur

शहरातील हत्तेनगर भागात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चाकूने भोसवूâन एका युवकाचा खून करण्यात आला. दुकान मालकीनीच्या मुलानेच दुकानात नोकर असलेल्या युवकाचा खून केला असून या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात खून आणि अ‍ॅक्ट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कापड लाईन भागात प्रितम सुटकेस हे गटागट यांचे दुकान आहे. या दुकानात गणेश रमेश कदम हा कामाला होता. दुकानाच्या मालकीनीचा मुलगा संयम प्रितम गटागट याने रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हत्ते नगर भागातील अक्षता मंगल कार्यालयाजवळ चाकूने गणेश रमेश कदम यास भोसकले. गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी खून आणि अ‍ॅक्ट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपअधिक्षक जितेंद्र जगदाळे हे करीत आहेत. ही घटना घडण्यापुर्वी मयत गणेश कदम आणि संयम गटागट यांच्यामध्ये मोबाईलवरुन बाचाबाची झालेली होती असेही सांगीतले जात आहे. खून करण्याचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read Entire Article