लातूरातील एकाच वस्तीगृहातील 40 विद्यार्थी निघाले कोरोनाबाधीत

1 week ago 1
corona-virus

शहरातील एमआयडीसी भागातील एकाच वस्तीगृहातील तब्बल 40 विद्यार्थी कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना 12 नंबर पाटी येथील कोव्हीड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे. लातूर शहरात मात्र यामुळे खळबळ उडाली आहे.

शिक्षणातील लातूर पॅटर्नमुळे लातूर जिल्ह्याची ओळख राज्यात सर्वत्र झालेली आहे. राज्यातील सर्व ठिकाणचे विद्यार्थी लातूरात शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे शहरात वस्तीगृह आणि खाजगी शिकवणीवर्ग यांची संख्या बेसुमार आहे. कोव्हीडमुळे सर्व बंद होते, हळूहळू शिक्षण सुरू होत असताना एमआयडीसी भागातील एका शिक्षण संस्थेच्या वस्तीगृहातील तब्बल 40 विद्याथ्र्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली आहेत. या वस्तीगृहामध्ये 300 विद्यार्थी राहतात. 240 विद्यार्थ्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली असता 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 12 नंबर पाटी येथील कोव्हीड सेंटरमध्ये या सर्वांना उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम आहे.

Read Entire Article