रुग्णालयात जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नाही, मग ‘या’ नंबर ‘वर कॉल करा

6 days ago 2
IIT Bombay students starts HelpNow service to provide ambulance in Mumbai and Pune

मुंबई: राज्यभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे यासारख्या महानगरांमध्येही साधी रुग्णवाहिका (ambulance) मिळवण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. रुग्णवाहिकेअभावी अनेक रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. (IIT Bombay students starts HelpNow service)

या पार्श्वभूमीवर ‘हेल्पनाऊ’ ही सेवा सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबई आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी ही सेवा सुरु केली आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये रुग्णवाहिकेसाठी जवळपास 12 तासांपर्यंत ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना वगळता इतर आजाराशी झगडत असलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. वेळेत रुग्णालय न गाठता आल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

त्यासाठी आता ‘हेल्पनाऊ’ ही सेवा फायदेशीर ठरत आहे. हेल्पनाऊ ही सेवा 24×7 कार्यरत आहे. हेल्पनाऊ सेवेच्या 88 99 88 99 52 या क्रमांकावर फोन केल्यास किमान मोठ्या शहरांमध्ये 15 ते 20 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे. मुंबई, पुणे, नवी दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये सध्या हेल्पनाऊ कार्यरत आहे.

आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका, टेस्टिंग लॅब आणि सरकारी संस्थांच्या मागणीनुसार हेल्पनाऊकडून रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या जातात. ही सेवा सशुल्क किंवा निशुल्क आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही. या सर्व रुग्णवाहिकांचे व्यवस्थितपणे निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच या रुग्णवाहिका व्हेंटिलेटर्स आणि इतर आरोग्य सुविधांनी सुसज्ज आहेत.

मुंबईतील कोरोना स्थिती?

मुंबईतही आज दिवसभरातील वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 16 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 14 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे.

मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन ठेपलाय. 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.91 टक्के झाला आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासांत 60 हजार रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

संबंधित बातम्या:

Maharashtra Corona Update : चिंताजनक; दिवसभरात 60 हजाराच्या घरात रुग्ण, मृतांचा आकडाही 300 पार

कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी, एप्रिल अखेरपर्यंत रुग्णसंख्या 12 लाखांवर जाणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून खुलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फोल?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

(IIT Bombay students starts HelpNow service)

The post रुग्णालयात जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नाही, मग ‘या’ नंबर ‘वर कॉल करा appeared first on TV9 Marathi.

Read Entire Article