रवी पुजारीला 14 दिवसांची पोलीस कोठडी, आतापर्यंत काय काय घडलं?

1 week ago 3
Ravi Pujari (1)

मुंबई : कुख्यात गुंड असलेल्या रवी पुजारीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी गँगस्टर रवी पुजारी याला आज सकाळी मुंबईतील कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना रवी पुजारीचा ताबा मिळवण्यात यश आलं होतं. (Gangster Ravi Pujari 14 days police custody)

रवी पुजारी याला कोर्टात सादर करतेवेळी त्याच्या तोंडावर बुरखा घालण्यात आला होता. रवी पुजारी हा आंतरराष्ट्रीय गँगस्टर होता. एकेकाळी मुंबईतील बिल्डर, बार मालक यांना रवी पुजारी आपल्या तालावर नाचवत होता. मात्र आता त्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रवी पुजारी हा भारतातील अनेक पोलील दलातील फरार आरोपी होता.

दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमधून अटक

अनेक वर्षांपासून फरार असलेला रवी पुजारीला गेल्यावर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली. यानंतर त्याच्याविरोधात खटला चालवण्यात आला. हा आरोपी आम्हाला हवा आहे. याच्यावर खून , खुनाचा प्रयत्न आणि खंडणी मागणे अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याला आमच्या ताब्यात द्या, असा युक्तिवाद मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आला होता.

मुंबई पोलिसांनी रवी पुजारीला भारतात प्रत्यार्पण करण्यात येत असतानाच मध्येच कर्नाटक पोलिसांनी एका खटल्याची कागदपत्र पुढे करून रवी पुजारीचा ताबा मिळवला. आता त्याला कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेऊन मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले आहेत.

Ravi Pujari

रवी पुजारी

रवी पुजारीच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर झाडल्या होत्या गोळ्या

2016 मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने 8 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मुख्य फरार असलेला आरोपी रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता. शनिवारी त्याला मंजुरी मिळाली असून, रवी पुजारीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यात रवी पुजारीला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याला कोठडी दिली.

रवी पुजारी मूळचा कर्नाटकातील मालपे येथील रहिवासी

रवी पुजारी मूळचा कर्नाटकातील मालपे (जि. उडपी) येथील असून, 1990 पासून मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून काम करत होता. सुरुवातीला गँगस्टर छोटा राजन याच्या टोळीत असलेल्या पुजारीने नंतर स्वतःची टोळी बनविली. मुंबईसह बंगळुरू, मंगळूर येथील विविध व्यावसायिकावर, बॉलिवूड, बिल्डर यांच्याकडे खंडणी गोळा करू लागला होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यामध्ये तो मुख्य आरोपी आहे. परदेशात पलायन केल्यानंतर सहकाऱ्यांमार्फत त्याने हे काम सुरू ठेवले होते. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही बजाविण्यात आली होती.

रवी पुजारीवर किती गुन्हे दाखल?

रवी पुजारी हा गेल्या 17-18 वर्षांपासून फरार असलेला आरोपी आहे. त्याच्याविरोधात सुमारे 100 च्यावर गुन्हे दाखल आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या एमएमआरडीए रिजनमध्ये सुमारे 78 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस दलात 49 गुन्हे आहेत. तर मोक्काचे 26 गुन्हे आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक राज्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

मुंबई पोलीस दलात दाखल झालेल्या 10 मोठ्या गुन्ह्यांच्या आधारावर त्याला भारताच्या हवाली करण्यात आलं आहे.आता त्याच्या विरोधात लवकरात लवकर खटले चालवून त्याला शिक्षा व्हावी यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत.  (Gangster Ravi Pujari 14 days police custody)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साई दर्शनावर मर्यादा, भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतच मंदिर खुलं https://t.co/psTVAXhHvU @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks #Saibaba #SaiTrust #NewRegulations #Corona #coronavirus

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2021

संबंधित बातम्या : 

अखेर कुख्यात गुंड रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात, उद्या किल्ला कोर्टात हजर करणार

गँगस्टर रवी पुजारीला भारतात आणलं, कर्नाटक पोलिसांना मोठं यश

The post रवी पुजारीला 14 दिवसांची पोलीस कोठडी, आतापर्यंत काय काय घडलं? appeared first on TV9 Marathi.

Read Entire Article