मेक्सिकोत कोरोनाने घेतले 1.80 लाख बळी

1 week ago 2

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 

मेक्सिकोत आतापर्यंत 20 लाख 43 हजार 632 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 80 हजार 536 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

वर्ल्डोमीटरनुसार, सोमवारी या देशात 03 हजार 104 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 310 जणांचा मृत्यू झाला. 20.43 लाख रुग्णांपैकी 16 लाख 02 हजार 024 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 61 हजार 072 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 4798 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिको जगात तेराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 52 लाख 85 हजार 123 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Read Entire Article