मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

6 days ago 1

मुंबई / ऑनलाईन टीम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी ११ मार्च रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर बरोबर २८ दिवसांनी त्यांनी आज लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच पुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य हे होम क्वारंटाइन आहेत तर रश्मी ठाकरे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा दुसरा डोस घेतला.

CM Uddhav Balasaheb Thackeray took his second dose of COVID vaccine today.#BreakTheChain pic.twitter.com/umpIaxGMlk

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2021

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Read Entire Article