‘मी भटकलो होतो, पण अल्लाहचा फर्मान आला’, म्हणत आणखी एका कलाकाराने बॉलिवूड सोडले

6 days ago 1
saqib-khan

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी धर्माचा हवाला देत स्वत:ला या ग्लॅमरस जगापासून दूर नेले आहे. आता यामध्ये आणखी एकाच्या नावाचा समावेश झाला आहे. एमटीव्हीवरील प्रसिद्ध शो रोडीजमध्ये काम केलेला कलाकार आणि मॉडेल साकिब खान याने इस्लामचा हवाला देत बॉलिवूडला रामराम केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याने याची माहिती दिली.

साकिब खान याने टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय सोशल मीडियावर पोस्ट लिहून दिला. तसेच यापुढे मॉडेलिंग आणि अॅक्टिंगही करणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. माझ्याकडे कामाची कमतरता नाही. परंतु मी अल्लाहच्या मर्जीने मी हे सर्व सोडून देत आहे. हा अल्लाहचा फर्मान असल्याचे साकिब खान याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

साकिब याने मुंबईमध्ये काम करणे अवघड असल्याचे म्हटले आहे. तसेच येथे पैसे कमावणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही, असेही त्याने म्हटले आहे. मात्र कमी काळामध्ये मी हे दोन्ही करून दाखवले याचा आनंद असल्याचे साकिबने म्हटले आहे.

आता यापुढील आयुष्यामध्ये आपल्याला फक्त शांतता हवी असल्याचे साकिबने म्हटले आहे. तसेच मी भटकलो होतो. इस्लामच्या विरोधात जात होतो. नमाज पठण करत होतो, मात्र शांतता मिळत नव्हती. आता मी स्वत:ला संपूर्णपणे अल्लाहला समर्पित करणार आहे, असेही साकिबने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टसोबत त्याने मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुरान हातात घेतलेला एक फोटोही पोस्ट केला आहे.


View this post on Instagram

A post shared by S A K I B K H A N (@saqibkhan_64)

दरम्यान, धर्माचे नाव घेत अॅक्टिंग सोडणारा साकिब पहिला कलाकार नाही. साकिबच्या आधी ‘दंगल’ चित्रपटामध्ये काम केलेली अभिनेत्री झायरा वसिम आणि अभिनेत्री सना खान यांनीही इस्लामचा हवाला देत बॉलिवूड सोडले होते.

Read Entire Article