भाजप आमदाराचे मुख्यमंत्री बदलाबाबत वक्तव्य

6 days ago 1

२ मे नंतर मुख्यमंत्री बदलणार
बेंगळूर/प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यत्नाळ यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांविरोधात पुन्हा विधान केलं आहे. यत्नाळ यांनी २ मे नंतर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या जागी नवा मुख्यमंत्री असे असे म्हंटले आहे.

“काहीजण म्हणतात की येडियुरप्पा सूर्य आणि चंद्र आहे तो पर्यंत मुख्यमंत्री असतील. हे कसे शक्य आहे? २०२३ मध्ये ते मुख्यमंत्री असतील तर ते ७५ वर्षांचे असतील त्यांना सेवानिवृत्त नियम लागू होत नाही का?” असे यत्नाळ यांनी विचारले. बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी , “येडियुरप्पा यांना दोन वर्षाचा बोनस मिळाला ही मोठी गोष्ट आहे. त्यांनी पक्षाच्या उच्च कमांड व कार्यकर्त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि १७ एप्रिलनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली पाहिजे.” असेही ते म्हणाले.

“२ मे नंतर हा बदल नक्कीच होईल, तो कोणत्याही दिवशी होऊ शकतो . त्यामुळे उत्तर कर्नाटकातील कोणीही मुख्यमंत्री बनेल, ” असे यत्नाळ यांनी म्हंटले आहे. विजापूर शहराच्या आमदाराने यापूर्वी येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदी अनेकदा हटविण्याची भविष्यवाणी केली होती. यापूर्वी येडीयुरप्पा आणि त्यांच्या सरकारवर वारंवार टीका केल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिली गेली होती.
येडियुरप्पा आणि त्याचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर टीका करताना यत्नाळ यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्यातील सर्व घडामोडींची माहिती असल्याचे सांगितले. हायकमांड त्यांच्या सर्व हालचालींनावर नजर ठेवून असल्याचेही ते म्हणाले. (पीटीआय)

Read Entire Article