प्रतिनिधी / शिराळा
तडवळे ता. ३२ शिराळा येथे काल झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात, बीड जिल्ह्यातील एक वर्षे वयाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. यातील पिडीत कुटुंबाला वनविभागाने काल तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली होती. तातडीची मदत म्हणून वन विभागाने १५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यातील पाच लाख रुपयाचा धनादेश आज मृत बालकाच्या कुटुंबीयांना देण्यात आला.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक गजानन चव्हाण, वनक्षेत्रपाल फिरते पथक सांगली चे युवराज पाटील,वनपाल बिळाशी चंद्रकांत देशमुख, वनपाल बिऊर हणमंत पाटील आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.