न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर आले 49 व्हेल

1 week ago 2

ऑनलाईन टीम / वेलिंग्टन : 

न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडच्या फेअरवेल स्पिट या किनाऱ्यावर अचानक 49 व्हेल मासे येऊन निपचित पडले. त्यामधील 40 माशांना पर्यावरण प्रेमींनी पुन्हा समुद्रात नेऊन सोडले. तर 9 माशांचा मृत्यू झाला. ‘प्रोजेक्‍ट जोना’ या व्हेल बचाव मोहिमेच्या प्रवक्‍त्या लुईसा हॉक्‍स यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

हॉक्‍स म्हणाल्या, सोमवारी सायंकाळी समुद्राला भरती आल्यावर भरतीच्या पाण्याबरोबर व्हेल मासे संपूर्ण किनाऱ्यावर येऊन पडले होते. जवळपास 200 पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्ते या व्हेलना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. व्हेलची कातडी कोरडी पडू नये म्हणून त्यांच्या अंगावर पाणी ओतण्यात आले. त्यांच्या पंखांवर अतिरिक्त वजन पडू नये, म्हणून त्यांना उताणे केले गेले आणि त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घेतली. 

समुद्रात सोडण्यात आलेले हे 40 व्हेल दूरवर गेले नाहीत, त्यामुळे पुन्हा भरती असल्यास ते व्हेल किनाऱ्यावर येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

Read Entire Article