जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, हॉस्टेल 31 मार्चपर्यंत बंद

1 week ago 1
ravindra-binwade

जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय,कोचिंग क्लासेस आणि हॉस्टेल 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

आज जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्यासह उच्च पदस्त अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा झाली. रुग्णवाढ झालेला बहुतांश भाग हा बुलढाणा जिल्ह्याला लागुन आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे त्याचा प्रभाव शेजारील भोकरदन, जाफराबाद तालुक्यात जाणवू लागला आहे.

मध्यंतरी कोविडच्या केसेस कमी झाल्यामुळे कोविड नियमावलीचे लोकांकडून योग्य प्रमाणाात पालन होत नसल्याचे दिसून आले. शासनाने गर्दीचे निकष घालून दिले आहे. मात्र तेही पाळतांना दिसत नाही. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा आणि हॉस्टेल 31 मार्चपपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून 10 वी आणि 12 वी वर्ग वगळण्यात आले असून हे वर्ग चालवितांना कोविड नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सर्व आठवडी बाजार विविध यात्रा 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. राजकीय आंदोलने, मोर्चे, धरणे यावरही बंदी करण्यात आली आहे.

टेस्टींग वाढणार

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात येणार आहे. व्यापारी, हॉटेल चालक, भाजी विक्रेते हे सुपरस्प्रेडर असून या सर्वांची तात्काळ रॅपिट अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोना नियमावली न पाळणाऱ्या लोकाविरुध्द कारवाईला वेग देण्यात येणार असून यासाठी नगर पालिकेचे पथके स्थापन करण्यात आली आहे. या पथकाला शिक्षकही मदत करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा फक्त विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आल्या असून शिक्षकांना मात्र शाळेवर हजर राहून ऑनलाईन शिक्षण द्यावे लागणार आहे. सर्वांनी मास्कचा वापर करावा, गर्दीचा ठिकाणे टाळावित, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.

Read Entire Article