जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत गुरुवारी ऑनलाईन वेबीनार

1 week ago 1

ऑनलाईन टीम / पुणे : 


जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्तरावर गुरुवार दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे, असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधता प्रमाणपत्रासंदर्भात 1 ऑगस्ट 2020 पासून अर्जदारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तसेच अर्जनिहाय सेवा शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही बरेच अर्जदार या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे कोणत्या प्रकारे अर्ज भरावा, कोणते दस्तावेज जोडावे, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत या वेबीनारमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


सर्व अर्जदार, पालक व विद्यार्थी यांनी या ऑनलाईन वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

Read Entire Article