कठोर निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाला मोठी झळ – शरद पवार

6 days ago 13

मुंबई / ऑनलाईन टीम

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. याला राज्यातील व्यापारी वर्गाकडून विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार जनतेशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यातील वैद्यकीय स्टाफ अहोरात्र काम करत असून परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. यशिवाय दुसरा पर्याय देखील नाही. केंद्र सरकारचाही हाच सूर आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी, केंद्र सरकार संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कठोर निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाला मोठी झळ बसत आहे. या परिस्थितीला धैर्याने आपण सामोरे गेलेच पाहिजे, याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे, आपण वास्तव स्विकारायला हवे. जनतेच्या जिविताच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. त्यासाठी, सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

Read Entire Article